Wednesday, 21 January 2015

जबाबदारी

प्रत्येकाने जाणीवपूर्वक एक जरी झाड लावले तर आपले शहर सुंदर होईलच पण पर्यावरणाची झीजही काही अंशी भरुन निघेल. पर्यावरणाने जे आपल्याला दिले आहे त्यापेक्षा भरभरुन आपण पुढच्या पिढीला दिले पाहिजे. घराघराभोवती, रस्त्याच्या कडेला, नद्यांच्या काठी, टेकडीवर सुंदर झाडे तसेच फुले असलेले चित्र प्रत्येकाच्या मनातून कृतीत उतरावे. निसर्गाकडून भरभरुन घेताना त्याला थोडे परत दिल्याचे समाधान आपल्याला मिळेल.
मुंबईत याला थोड्याशा मर्यादा आहेत पण इतर ठिकाणी हे प्रयोग करायला काहीच हरकत नाही. प्रत्यक्षात आपण निसर्गाचे देणे लागतो ते निसर्गाचे देणे आपण झाडे लावून फेडले पाहिजे. एका झाडाने याची सुरुवात करु या.
महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर लागवड व्हावी यासाठी शासनाने सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने मोठ्या प्रमाणावर रोपवाटीका निर्माण केल्या आहेत.

शिवाजी महाराजांचे वृक्षप्रेम

शिवाजी महाराजांनी सह्याद्रीच्या डोंगर-दर्‍यांचा योग्य प्रकारे अभ्यास करून, समजुन-भटकुन स्वराज्याची मुहुर्तमेढ रोवली होती. प्रतापगडचे घनदाट जंगलाचा अतिशय योग्य उपयोग करुन स्वराज्यावर चालून आलेल्या अफ़झल खानाला संपविले. शिवाजी महाराजांनी आज्ञापत्रात स्पष्ट म्हटले आहे की फणस, आंबा असी विशिष्ट झाडे कदापी तोडू नये, कारण ती रयतेने मोठ्या प्रेमाने आपल्या लेकरांसाठी वाढविली आहेत. ती तोडून रयतेची हाय घेऊ नये. आरमारसाठी लाकूड लागत असल्यास परमुलखातून आणावीत. आपल्या राज्यातही उपयोगी असी आंबा, फणस, सागवान व विविध प्रकारची वृक्षांची लागवड करावी.

निसर्गाची पुजा

आपल्याकडे झाडांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. वृक्षाला देवतेच्या रूपात पुजले जाते. यामध्ये वडाच्या झाडाला विशेष महत्त्व आहे. वारंवार पडणाऱ्या दुष्काळावर व पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षलागवडीच्या माध्यमातून उपाय शोधता येतील निसर्गाची पुजा आपण या दिवशी निसर्गाचाच विध्वंस करुन करत असतो याची जाणीव बऱ्याच जणींना नसते.




तुळस:

काही भारतीय नावे - वृंदा (बंगाली), मंजिरी (संस्कृत), बिंदा, गग्गेरू( तेलुगू), भूतघ्नी, बहुमंजरी, अजेतराक्षसी, गौरी, अमृता, श्रेष्ठतमा.
तुळस औषधी आहे. तिची पाने सर्दी, पडसे, खोकल्यावर गुणकारी असतात. बिया पचनसंस्थेच्या विकारांवर उपयोगी आहेत. पानांपासून निघणारे तेल जंतुघ्न असून त्वचारोगांत वापरतात. कीटकनिवारक, विशेषतः मलेरियाच्या डासांचा प्रतिकार करण्याकरता संपूर्ण वनस्पतीच सज्ज असते. ओझोनकर्ता, प्रदूषणहर्ता अशी तुळस आजूबाजूची हवा शुद्ध करते.पर्यावरणीय आणि वैद्यकीयदृष्ट्या अतिशय उपयुक्त अशा तुळशीला पूर्वजांनी मानाचं स्थान दिलं

पळस उर्फ वनज्योत:
भारतीय नावे - पलाश, ढाक, किंशुक (संस्कृत), परासु (तमीळ), मोडुगा (तेलुगू)

पळसाच्या लाल, खोडापासून स्त्रवणार्‍या डिंकाचा उपयोग कातडे कमावण्यासाठी करतात. लाखेचे किडे पळसाच्या कोवळ्या फांद्यांवर पोसतात. ही लाख रंगांत, सीलिंग वॅक्स म्हणून वापरतात. पानांच्या पत्रावळी बनवतात आणि क्वचित इरली बनवायलाही त्यांचा वापर होतो. मुळांपासून मिळणार्‍या धाग्यांचे दोर होतात. लाकूड पाण्यातही टिकून राहते, म्हणून होड्या बनवण्यासाठी वापरतात.

  उंबर:
महाराष्ट्रात उंबराच्या झाडाला दत्तगुरूंचं निवासस्थान म्हणून धार्मिक महत्त्वं आहे, हे काही नव्याने सांगायला नकोय; मात्र आयुर्वेदात उंबराच्या झाडाचं आणि फळाचं महत्त्व मात्र अनन्यसाधारण आहे. उंबराच्या फळांपासून भाजी आणि लापशीही करता येते. वाचून आश्चर्य वाटलं ना. 

उंबराला फळ लागण्याचा काळ म्हणजे ऐन थंडीचा मोसम. थंडीत साधारणपणे डिसेंबर महिन्यात उंबराच्या झाडाला फळं लागण्यास सुरुवात होते. डिसेंबरच्या मध्यावर फळं थोडी मोठी झाली की, त्यांची भाजी केली जाते. ती भाजी मधुमेहींसाठी उपयुक्त असते. तांदळाच्या उकडीपासून केल्या जाणा-या भाकरीबरोबर ती रुचकर लागते.मानवी शरीरात वाढणारं जास्तीचं पित्त शमवण्याची ताकद या उंबराच्या फळात आहे.

झाडाची व्यथा

एकीकडे काहीजण प्रदूषण मंडळाला दोष देतात. पण रोड वरील झाड तोडण्यात आली त्या बद्दल कोणीच बोलत नाही. झाड का तोडली?

वृक्षतोड आणि स्वार्थी मनुष्य

असं म्हटलं जातं की, जेव्हा मानवाने ह्या भूतलावर पहिलं पाऊल ठेवलं, तेव्हापासूनच निवाऱ्याकरिता मानवाने वृक्षतोडीस सुरुवात केली.विविध कारणांसाठी केली जाणारी ही भरमसाट वृक्षतोड आता इतकी वाढली आहे कि यामुळे जंगलेच नष्ट होतात कि काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ह्या वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल ढासळू लागला आहे. वातावरणाच्या तापमानात वाढ झाल्याने त्याचा विपरीत परिणाम मानवी आरोग्यावरही व्हायला लागला आहे.


वृक्षतोडीमुळे जल, स्थल आणि वायूप्रदूषणही वाढले आहे. मानवाने जंगलांवर कब्जा केल्याने वन्य प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहेच, मात्र पावसाचे प्रमाणही कमी झाले आहे. मानवाला पिण्यायोग्य पाण्याचा मुख्य स्त्रोत ‘पाऊस’ असल्याने दुष्काळाची समस्या जाणवू लागली आहे. प्रदूषणामुळे बहिरेपणा, डोळ्यांचे विकार, श्वसनाचे आजार, हृदयविकार अशा आजारांत वाढ झाल्याचे चित्र बघायला मिळते

हिमालयातील वृक्षतोडीचा भारतातील सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या गंगा नदीलाही फटका बसला आहे. ज्या हिमनदीतून गंगा उगम पावते ती हिमनदीच लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. नुकत्याच उत्तराखंड राज्यात झालेल्या अतिवृष्टीचा संबंध तेथील वृक्षतोड, खाणकाम आणि डोंगरं उध्वस्त करून केलेल्या बांधकामाशी जोडला गेला आहे. निसर्गावर हल्ला करून आपले साम्राज्य प्रस्थापित करू पाहणारा मानव असे करून आपलेच अस्तित्व धोक्यात घालत आहे.


झाडांचा उपयोग

एक  पूर्ण वाढलेले झाड ५० वर्षापर्यंत  सुमारे ६ लाख रुपयांचे ऑक्सिजन  पुरवते .
एक झाड त्याच्या जिवनामध्ये १०. ५० लाखांचे हवचे प्रदुषण  रोखते .
एक झाड त्याच्या जिवनामध्ये जमिनीला  ६. ५० लाख रुपयांचे  पोषक मुळे  पुरवते .


पण झाडाची उपयोग  इतेच  संपत नाही .तर झाडांपासून फळे , लाकूड , विविध पक्षासाठी  आसरा  मिळतो .झाडांपासून अनेक औषधे बनवली जातात  त्यापासून  माणसाला  जीवदान  मिळते .प्रत्येकाने  एक  तरी झाड लावावे  ते जागवावे ,आणि वाचवावे  तरच आपण भावी पीडी साठी आजच्या दराने २५ लाख  रुपयाची मालमत्ता तयार करतो .