आपल्याकडे झाडांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. वृक्षाला देवतेच्या रूपात पुजले जाते. यामध्ये वडाच्या झाडाला विशेष महत्त्व आहे. वारंवार पडणाऱ्या दुष्काळावर व पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षलागवडीच्या माध्यमातून उपाय शोधता येतील निसर्गाची पुजा आपण या दिवशी निसर्गाचाच विध्वंस करुन करत असतो याची जाणीव बऱ्याच जणींना नसते.
तुळस:
काही भारतीय नावे - वृंदा (बंगाली), मंजिरी (संस्कृत), बिंदा, गग्गेरू( तेलुगू), भूतघ्नी, बहुमंजरी, अजेतराक्षसी, गौरी, अमृता, श्रेष्ठतमा.
तुळस औषधी आहे. तिची पाने सर्दी, पडसे, खोकल्यावर गुणकारी असतात. बिया पचनसंस्थेच्या विकारांवर उपयोगी आहेत. पानांपासून निघणारे तेल जंतुघ्न असून त्वचारोगांत वापरतात. कीटकनिवारक, विशेषतः मलेरियाच्या डासांचा प्रतिकार करण्याकरता संपूर्ण वनस्पतीच सज्ज असते. ओझोनकर्ता, प्रदूषणहर्ता अशी तुळस आजूबाजूची हवा शुद्ध करते.पर्यावरणीय आणि वैद्यकीयदृष्ट्या अतिशय उपयुक्त अशा तुळशीला पूर्वजांनी मानाचं स्थान दिलं
पळस उर्फ वनज्योत:
भारतीय नावे - पलाश, ढाक, किंशुक (संस्कृत), परासु (तमीळ), मोडुगा (तेलुगू)
पळसाच्या लाल, खोडापासून स्त्रवणार्या डिंकाचा उपयोग कातडे कमावण्यासाठी करतात. लाखेचे किडे पळसाच्या कोवळ्या फांद्यांवर पोसतात. ही लाख रंगांत, सीलिंग वॅक्स म्हणून वापरतात. पानांच्या पत्रावळी बनवतात आणि क्वचित इरली बनवायलाही त्यांचा वापर होतो. मुळांपासून मिळणार्या धाग्यांचे दोर होतात. लाकूड पाण्यातही टिकून राहते, म्हणून होड्या बनवण्यासाठी वापरतात.
उंबर:
महाराष्ट्रात उंबराच्या झाडाला दत्तगुरूंचं निवासस्थान म्हणून धार्मिक महत्त्वं आहे, हे काही नव्याने सांगायला नकोय; मात्र आयुर्वेदात उंबराच्या झाडाचं आणि फळाचं महत्त्व मात्र अनन्यसाधारण आहे. उंबराच्या फळांपासून भाजी आणि लापशीही करता येते. वाचून आश्चर्य वाटलं ना.
उंबराला फळ लागण्याचा काळ म्हणजे ऐन थंडीचा मोसम. थंडीत साधारणपणे डिसेंबर महिन्यात उंबराच्या झाडाला फळं लागण्यास सुरुवात होते. डिसेंबरच्या मध्यावर फळं थोडी मोठी झाली की, त्यांची भाजी केली जाते. ती भाजी मधुमेहींसाठी उपयुक्त असते. तांदळाच्या उकडीपासून केल्या जाणा-या भाकरीबरोबर ती रुचकर लागते.मानवी शरीरात वाढणारं जास्तीचं पित्त शमवण्याची ताकद या उंबराच्या फळात आहे.

No comments:
Post a Comment