प्रत्येकाने जाणीवपूर्वक एक जरी झाड लावले तर आपले शहर सुंदर होईलच पण
पर्यावरणाची झीजही काही अंशी भरुन निघेल. पर्यावरणाने जे आपल्याला दिले आहे
त्यापेक्षा भरभरुन आपण पुढच्या पिढीला दिले पाहिजे. घराघराभोवती,
रस्त्याच्या कडेला, नद्यांच्या काठी, टेकडीवर सुंदर झाडे तसेच फुले असलेले
चित्र प्रत्येकाच्या मनातून कृतीत उतरावे. निसर्गाकडून भरभरुन घेताना
त्याला थोडे परत दिल्याचे समाधान आपल्याला मिळेल.
मुंबईत याला थोड्याशा मर्यादा आहेत पण इतर ठिकाणी हे प्रयोग करायला काहीच हरकत नाही. प्रत्यक्षात आपण निसर्गाचे देणे लागतो ते निसर्गाचे देणे आपण झाडे लावून फेडले पाहिजे. एका झाडाने याची सुरुवात करु या.
महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर लागवड व्हावी यासाठी शासनाने सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने मोठ्या प्रमाणावर रोपवाटीका निर्माण केल्या आहेत.